#BBCMarathi #titan #titanic #titanicsubmarine #Bombaydockexplosion #mumbaidock
पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. पण या निमित्ताने 110 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक या जहाजाची सुद्धा चर्चा सुरू झाली.शंभर वर्षांनंतरही टायटॅनिकचा अपघात जगभरात एक रहस्य, दंतकथा बनून राहिला आहे. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात फोर्ट स्टायकिन या जहाजात दोन महाभयानक स्फोट झाले होते. या स्फोटात 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं, मात्र, याविषयी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. या स्फोटामुळे बसलेले हादरे पुण्यापर्यंत जाणवले होते. मुंबईतील अनेक इमारती कोसळल्या. ट्राम आणि रेल्वेसेवा दोन दिवस बंद पडली होती. इतकंच नव्हे तर व्हिक्टोरिया डॉकचं स्फोटामुळे झालेलं नुकसान भरून काढून बंदर पुन्हा सुस्थितीत उभं करण्यासाठी मजुरांना पुढचे तब्बल 6 महिने मोठी मेहनत घ्यावी लागली. या स्फोटात मुंबईच्या अग्निशमन दलातील 66 जवान शहीद झाले होते, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशात 14 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान अग्निशमन शहीद सप्ताह पाळण्यात येतो.
जाणून घेऊ, या फोर्ट स्टायकिन जहाजाची संपूर्ण कहाणी.
संशोधन - हर्षल आकुडे
निवेदन - पराग फाटक
व्हीडिओ एडिटर - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!