निजली रात निजे चांदोबाही ...
बाळाला झोप का ग येत नाही ..?
अंगाई ही क्वचित घडणारी रचना .. कविता -गायन ह्यातला सगळ्यात सोपा आणि तरीही सगळ्यात अवघड प्रकार ..प्रत्येक स्त्री गायिका होते ती आई होऊन अंगाई गातांना ... इतकं सहज .. बाळाच्या जावळाच्या स्पर्शाइतकं मऊ .. गेल्या २५ वर्षांत फक्त ४ अंगाईच्या रचना सुचल्या ... काय असतं इतकं खास ह्या अंगाई मध्ये ? अंगाई गात आपल्याला आईने थोपटावं हे फक्त बाळांना वाटत असेल का आत्ताच्या काळात अनेक प्रकारच्या तणावातून जाणाऱ्या मोठ्यांना सुद्धा वाटत असेल ?
चाळीशतल्या मुलाला सुद्धा वाटत असेल ना कि आईने अंगाई गावी ..
संदीपची एक कविता .. आता मोठा हो रे बाळा ... त्याने ह्या व्हिडिओत ऐकवली आहे .. ... ही कविता ऐकतांना नेहमीच गळा दाटून येतो .
" एकदा काय झालं " मधली अंगाई .. एका वेळी दोन आईंनी दोन मुलांना म्हटलेली .. छोट्या मुलाला आणि त्याच्या बाबाला सुद्धा ... !!
सुनिधी चौहान ह्यांच्या स्वरांनी ह्या आमच्या रचनेला आलेली झळाळी खूप भारावून टाकणारी आहे .. !!
full song
[ Ссылка ]
video by- Parag Mategaonkar
![](https://i.ytimg.com/vi/LaHS92PcWlQ/mqdefault.jpg)