श्री स्वामी समर्थ
ध्यान.....
प्रत्येकाला कुतूहल असतं, आपण कित्येकदा ध्यान करण्याचा प्रयत्न करतो आणि तेरड्याचा रंग तीन दिवसच असा अनुभव घेत हे मला जमणार नाही म्हणत दुर्लक्ष करतो.
मुलाला सायकल हवी तर ती आधी शिकायला हवी, त्यासाठी चालवण्याचा सराव हवा.असं केलं तर सुरवातीला पडत अडखळत घाबरत सायकल चालवणारा मुलगा एका हातात मोबाईल धरुन कधी सहज सायकल चालवू लागतो.
ध्यानाचही असच आहे. सराव सातत्य हवं. आत शांत स्थिर होणं हा ध्यानाचा परिणाम आहे. आपण सुरवातीलाच ही धारणा धरतो की ध्यानाला बसायचं तर मन आधी शांत हवं,
पण सुरवातीला आवश्यक आहे ते सातत्य. दररोज ध्यानासाठी बसायचे आहे हा निर्धार.
यातला 'बसायचं' हा शब्द लक्षात घ्यायला हवा.
एका जागी बसण्याचा सराव होतो.
कसं बसायचं ते पाहूया....
आता मधूर मंजूळ अशा संगीत नाद उर्जेशी जोडून घेत आपण ध्यानासाठी बसण्याची तयारी अगदी उल्हासाने करुया. सद्गुरु कृपेने आनंद लुटूया.
गुरुदेव दत्त
___________________________________________________________
meditation,guided meditation,meditation guided,morning meditation,meditation music,10 minute meditation,meditation morning,meditation for anxiety,mindfulness meditation,healing meditation,guided meditation 10 minutes,sleep meditation,meditation 10 minutes,meditation for beginners,guided morning meditation,10 minute guided meditation,guided meditation 10 min,fast meditation,quick meditation,10 min meditation,guided mindfulness meditation
![](https://s2.save4k.ru/pic/LisByq-XmIQ/maxresdefault.jpg)