#chhaganbhujbal #obcreservation #marathareservation #manojjarange #pune #maharashtrapolitics #ABPMajha #MarathiNews
Pune Chhagan Bhujbal Indapur : मराठ्यांकडे 20 टक्के , आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. ओबीसी समाजाला ( obc Reservation) 27 टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे. ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9 टक्के मिळाल्यात. आधी 27 टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (manoj jarane patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. इंदापूर (Pune Indapur) येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
विचार करणारा मराठा समाज गप्प का ? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का? मतं त्यांची आहेत, मग आमची नाहीत का? त्यांची लेकरं आहेत, मग आमची नाहीत का? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला. आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही, असे भुजबळ म्हणाले.
आरक्षणावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची 20 टक्के आणि 80 आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह पाटील तुम्हाला कुणबी सर्टीफिकेट पाहिजे आहेत का? सांगा ना पाहिजे का नाही? तळागाळातील लोकांना वरती आणले पाहिजेत, आमचे लोक गरिब का राहिले असते पण त्यांना काही काळतच नाही. आम्हाला 27 टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. सरकारमध्ये फक्त आम्हाला 9 टक्के आरक्षण आहे. ते 27 टक्के भरा मग बाकीचे काही करा. लोकसेवा आयोगात 85 टक्के मराठा समाज आहे, सारथी, अण्णाभाऊ साठे, ews मधील 85 टक्के मराठा समाजाचे, कुणबी आहेत ते आमच्यात आहे. पंजाबराव देशमुख कृषी योजना त्यात मराठा समाज आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सगळे गणीतच मांडले.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here: [ Ссылка ]
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: [ Ссылка ]
Social Media Handles:
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
[ Ссылка ]
Download ABP App for Apple: [ Ссылка ]
Download ABP App for Android: [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/PUmek0eNmMI/maxresdefault.jpg)