MPSC राज्यसेवा लागणारी कागदपत्रे :
१. जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकत्वाचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा/दवाखान्याचा/ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.
२. मूळ पदवी/ पदव्युतर पदवी आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले, समतुल्य अहर्ता असल्यास त्याबाबत पुरावा /शासन निर्णय.
३. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.(जर तुमचा दहावीला मराठी विषय असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जर नसेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. आणि बहुदा महाराष्ट्रातील सर्वांचा दहावीला मराठी हा विषय असतोच.त्यामुळे ज्यांचा असेल त्यांना लागणार नाही)
४. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला.
५. कालावधीतील नॉन- क्रीमिलेयर (NCL) प्रमाणपत्र.
६. जातीचे / जमातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.
७. दिव्यांग आरक्षणाचा दावा केला असल्यास www.swavlambancard.gov.in या नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.
८. खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वीची विभागीय क्रीडा उप संचालकांकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल व संबंधित क्रीडा प्रमाणपत्र.
९. अनाथ आरक्षणाचा दावा केला असल्यास विहित प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र.
१०. लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्रन.
११. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरिता माजी सैनिक असल्याचा पुरावा व माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा.
१३.पॅनकार्ड, आधार कार्ड , निडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी किमान एक ओळखपत्र आवश्यक.
#documentsformpsc #dvmpsc
Ещё видео!