#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. पण जिनं आरोप केला, ती रेणु शर्मा नेमकी कोण, हाही प्रश्न लोक विचारतायत. रेणु शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे.
रेणु मूळची इंदौरची...रेणुला एकूण 4 भावंड आहेत, लहानपणापासून तिला गाण्याची आवड. आणि जिच्यासोबत आपले संबंध असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंनी मान्य केलंय, त्या करूणा शर्माची रेणू बहीण. देसी लव्ह, बेशरम, फुलों की तरह खिलते देखां ही तिची काही गाणी, याशिवाय मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर हे मराठी आयटम साँगही तिने गायलंय. लान्स गोल्ड अवॉर्ड तिचा पहिला अवॉर्ड, टिफाचा बेस्ट प्ले बॅक सिंगरचा अवॉर्डही रेणुला 2018 मध्ये देण्यात आलेला. महाराष्ट्राचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. 11 जानेवारीला त्यांनी मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. धनंजय मुंडे हे गेल्याकाही वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत असल्याचं तिने म्हटलंय. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, आणि रेणू यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
इतकंच नाही तर २००९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केलीये. माझ्या जीवितीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्यात, असा उलट आरोपही मुंडेंनी रेणुका शर्मावर केला.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Ещё видео!