कल्याणच्या डीसीपी ऑफिसच्या आवारात स्फोटकं सापडल्याचा प्रकार आज संध्याकाळी घडला. एका रिक्षेत ही स्फोटकं ठेवण्यात आली होती. कल्याणच्या खडकपाडा भागात प्रशासकीय इमारत असून यात डीसीपी ऑफिस, निवडणूक कार्यालय आणि दुसऱ्या प्रांताधिकारी कार्यालय आहे. अंबरनाथ तालुक्यातल्या वसत गावातून 3 महिला त्यांच्या जमिनीच्या कामासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आल्या होता. यानंतर काही वेळात एका रिक्षेत स्फोटकं असल्याची निनावी चिठ्ठी डीसीपी ऑफिसमध्ये सापडली. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब स्क्वॉड आणि श्वानपथकाला पाचारण करत परिसराची झाडाझडती घेतली. यात या महिला ज्या रिक्षेतून आल्या होत्या, त्याच रिक्षेत डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या.
Ещё видео!