घुमू दे तुतारी
महाराष्ट्राचा हुंकार
थरथरे दिल्लीचा दरबार
सत्याची ताकद न्यारी
हा योद्धा कणखर आरी
घुमू दे तुतारी... घुमू दे तुतारी
पवार साहेबांची... घुमू दे तुतारी
राष्ट्रवादीची... घुमू दे तुतारी ।। धु ।।
महाराष्ट्राच्या मातीला
ज्यांच्या घामाचा गंध
रात्रंदिन खपुनी ज्यांनी
जनतेस दिला आनंद
त्यांच्या दिग्विजयासाठी
ही काळाची ललकारी
घुमू दे तुतारी... घुमू दे तुतारी । १ ।।
सह्याद्रीसम स्थितप्रज्ञ
राहुनिया सुखदुःखात
चढउतार एकसमान
अविचल वादळवाऱ्यात
भक्कम आधारवडाची
सावली आम्हाला प्यारी
घुमू दे तुतारी... घुमू दे तुतारी || २ ।।
बळीराजा, माताभगिनी,
उद्योजक अन् तरुणाई
आभाळ दिले साऱ्यांना
होउ दे आता उतराई
लाभो पुनःश्च नेतृत्व जे
संकटामधुन तारी
घुमू दे तुतारी... घुमू दे तुतारी || ३ ।।
टीकेस कृतीने उत्तर
ठेविला असा आदर्श
सामर्थ्य विचारांचे हे
जणु की परिसाचा स्पर्श
मिळतसे कौल विजयाचा
बांधा तोरण हो दारी
घुमू दे तुतारी... घुमू दे तुतारी || ४ ।।
Ещё видео!