#आंबाबर्फी #MangoBarfi #KanchanBapatrecipes #chitaleaambavadi #aambavadi #आंबावडी #aalyachivadi #आंब्याचीवडी #aambaburfi #aamkiburfi #आमकीबर्फी #mangovadi #traditionalmarathifood #कांचन_बापट_रेसिपीज #marathirecipe #aamba #vadi #burfi #बर्फी #aamba #mangorecipe #mangoreccipes #आंब्याचेपदार्थ #sweet #sweets #sweetrecipe #dessert #desserts #पक्वान्न #festivalrecipes
परफेक्ट आंबा बर्फी करण्याची सोपी रेसिपी
Perfect Recipe Of Mango Barfi
Kanchan Bapat recipes
INGREDIENTS ( साहित्य )
Natural Mango Pulp ( आंब्याचा रस ) 2 Cups ( 2 वाटी )
Sugar ( साखर ) 1.5 - 2 Cups ( 1.5 - 2 वाटी )
Milk Powder ( मिल्क पावडर ) 1 Cup ( 1 वाटी — साधारण 80 gm)
कृती - आंब्याचा रस Mixer वर एकदा फिरवून घ्यावा. Pan मध्ये तयार रस घेऊन त्यात दिड ते दोन वाट्या साखर घालून मोठ्या गॅसवर आटायला ठेवावं. आधी साखर विरघळून मिश्रण पातळ होतं. तोपर्यंत गॅस मोठाच असू द्यावा..
#Kanchanbapatrecipes
मिश्रण अर्धवट आटून थोडं घट्टसर झाल्यावर त्यात मिल्क पावडर घालावी. 1-2 tbsp मिल्क पावडर वगळावी. आता गॅस बारीक असू द्यावा.. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आटवावं. मिश्रण फारच पातळ असताना उतरवू नये.. त्यामुळे वडी नीट पडत नाही. जीभ आल्यावर गॅस बंद करावा. त्यात उरलेली मिल्क पावडर घालून छान घोटून घ्यावं.
#Kanchanbapatrecipes
बटर पेपर लावलेल्या ट्रे मधे मिश्रण ओतावं. व्यवस्थित थापून घ्यावं. *गॅसवरून उतरवल्यावर साधारण अर्ध्या पाऊण तासात वडी अर्धवट सेट होते..
अर्धवट कोमट झाल्यावर वड्या पाडून ठेवाव्यात. आणि साधारण 2 तास ते 4 तासात वडी पूर्ण set होते. पूर्ण गार झाल्यावर काढून घ्याव्यात.* #Kanchanbapatrecipes
साखरेचं प्रमाण कमी झालं असेल तर किंवा मिश्रण गॅसवरून थोडं लवकर उतरवलं गेलं तर वडी पडायला उशीर होतो. त्यासाठी 8-10 तास वेळही लागु शकतो. #Kanchanbapatrecipes
या वड्या बरेच दिवस टिकू शकतात.. पण संपूनच जातात..
#Kanchanbapatrecipes
IMPORTANT TIPS
⏺️ कधी कधी
वडी का पडत नाही ? किंवा मिश्रण मऊ का रहातं ? वडी कडक का होत नाही ? वडी चिवट का होते?#Kanchanbapatrecipes
🔅 साखरेचं प्रमाण खूपच कमी झालं तर मिश्रणाची वडी पडायला उशीर होतो.
🔅 मिश्रण घट्ट व्हायच्या आधीच मिल्क पावडर घातली तर वडी चिवट होऊ शकते.
🔅 मिश्रण कोरडं व्हायच्या आधीच गॅसवरून उतरवलं तरी वडी मऊ होऊ शकते.#Kanchanbapatrecipes
🔅 वडी लगेच set /कोरडी होत नाही.. कमीतकमी 2 तासांपासून 12 तासांपर्यंत वडी सेट व्हायला वेळ लागु शकतो..
🔅 मिल्क पावडर ऐवजी dairy whitener वापरलं तरी वडी चिवट होऊ शकते. त्यासाठी उत्तम quality ची मिल्क पावडर वापरावी.
⏺️ वडी मऊ झाली तर काय करायचं ? 🤔
🔅 वडी मऊ झाली तर सगळ्यात आधी 12 तासापर्यंत वाट पहावी.#Kanchanbapatrecipes
🔅 12 तासांपर्यंत वडी सेट झाली नाही तर परत एकदा नॉनस्टिक pan मध्ये मिश्रण अजुन घट्ट व्हायला ठेवा. त्यात परत थोडी मिल्क पावडर घालुन मिक्स करा. मिश्रणाचा चांगला गोळा झाला की गॅस बंद करून थोडा वेळ मिश्रण घोटून घ्या. नंतर वडी थापा .
#Kanchanbapatrecipes
काही प्रॉब्लेम आला तर माझ्या Kanchan Bapat recipes या फेसबुक page वर वडीचे फोटो / video पाठवा..
![](https://i.ytimg.com/vi/ajVaa9e0cY4/maxresdefault.jpg)