#tukaramgatha
#tukaramabhang1
#तुकारामगाथा
#अभंग
#howtobehappy
श्री तुकाराम गाथा अभंग क्र १ ओवी व अर्थासह | Shree Tukaram Gatha abhang with lyrics and meaning no 1
श्री संत तुकाराम महाराज देहूकर यांची श्री तुकाराम अभंग गाथेच्या रूपाने अवीट गोडीची ठेव आपणाला , समस्त विठ्ठल भक्तांना , वारकरी संप्रदायाला , किंवा सर्व ठायी एकच परमेश्वर आहे असे मानणाऱ्या भक्तांना लाभलेली आहे . श्री तुकोबांची अध्यात्माची उंची अपार आहे . म्हणूनच तुका झालासे कळस अथवा तुका आकाशा एव्हढा असे म्हटले जाते. श्री पांडुरंगाच्या कृपेने या गाथेतील प्रत्येक अभंग अर्थासह सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जय जय रामकृष्ण हरी .🙏
या व्हिडिओ मध्ये , खालील अभंग व त्याचा अर्थ भगवद कृपेने प्रस्तुत चालीत सादर केलेला आहे. या माध्यमातून आपणा सगळ्यांच्या अंतरी विठुरायाची भक्ती उदगम पावावी अशी श्री पांडुरंग चरणी मागणी आहे.
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
Ещё видео!