गायक :
प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन
संगीत :
प्रथमेश उमेश लघाटे
गीत :
कौस्तुभ अरुण आठल्ये
संगीत संयोजन व प्रोग्रॅमिंग :
राजन किल्लेकर
रेकॉर्डिंग :
प्रथमेश लघाटे
मिक्सिंग व मास्टरिंग :
राजन किल्लेकर
व्हिडियोग्राफी :
दीप्ती जोशी,
प्रतिक लघाटे,
प्रथमेश लघाटे
व्हिडियो एडिटींग :
प्रथमेश लघाटे
कॅलिग्राफी आणि आर्टवर्क :
दीप्ती जोशी
विशेष आभार :
सुधीर साठे,
आदित्य सरपोतदार,
राजा केळकर,
लघाटे कुटुंबीय
निर्मिती संकल्पना :
©️Prathamesh Laghate Official
———————————————————————-
शब्दः
करुणामय हा दत्त दयाघन ठायी ठायी वसे
तरुवेलींशी अणुरेणुंशी आम्हां दत्त दिसे ॥ध्रु.॥
दत्त दिसे मज रानमळ्यांशी
कृष्णेच्या या संथ जळाशी
क्षण सौख्याचे अवघे त्याच्या चरणांचेच ठसे...
तरुवेलींशी अणुरेणुंशी आम्हां दत्त दिसे ॥१॥
दत्त ऋतुंची ये - जा ठरवे
देह बहरता महिमा मिरवे
याच्यावाचुन सखासोयरा दुसरा कोणी नसे...
तरुवेलींशी अणुरेणुंशी आम्हां दत्त दिसे ॥२॥
दत्त आठवे कातरवेळी
दत्त भैरवी...दत्त भूपाळी
अमुच्या अवघ्या सप्तसुरांचे कारण दत्त असे...
तरुवेलींशी अणुरेणुंशी आम्हां दत्त दिसे ॥३॥
![](https://i.ytimg.com/vi/sYNx9tyEPe8/maxresdefault.jpg)