भारतातील पाहिलं-वहिलं आणि एकमेव 'पुस्तकांचं गाव'-भिलार.
पाचगणी आणि महाबळेश्वरपासून अगदी जवळ, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं टुमदार गाव-भिलार. स्ट्रॉबेरी आणि पावसाळ्यात पाचगणीतून दिसणाऱ्या धबधब्यासाठी परिचित असलेलं हे गाव, आता पुस्तकांचं गाव म्हणूनही ओळखलं जातंय. मराठी भाषा विभागाच्या 'राज्य मराठी विकास संस्था' आणि भिलार गावच्या ग्रामस्थांच्या साहाय्याने, महाराष्ट्र शासनाने ही संकल्पना 2017 साली प्रत्यक्षात उतरवली. काही ठराविक घरं, लॉज, शाळा आणि मंदिरं अशा एकूण 25 जागांमध्ये मराठी संस्कृती,नाटक, कादंबरी, ऐतिहासिक ग्रंथ, चरित्र, नियतकालिके, क्रीडा, बालसाहित्य, या आणि अशा अनेकविध विषयांची 15000 हुन अधिक पुस्तकं मांडण्यात आली. पुस्तकांची योग्य निवड आणि विभागणी, ठिकठिकाणी भिंतींवर रेखाटलेली चित्रं, पेंटिंग्ज, वाचकांच्या सोयीसाठी केलेली पुस्तकांची कल्पक व सुबक मांडणी, उत्तम व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे वाचकांच्या माध्यमातून या गावाबद्दल प्रचार आणि प्रसार झाला नसता तरच नवल. म्हणूनच पुस्तकांच्या गावला एक वर्ष पूर्ण होता होता, मे 2018 मध्ये आणखी पाच नवी घरे या प्रकल्पात जोडली गेली. वाचकांनी आपल्या आवडीचे पुस्तक निवडावे आणि निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात वाचनानंद अनुभवावा हे उद्दिष्ट ठेवून सुरुवात केलेल्या या प्रकल्पात या वर्षी अजून एक भर पडली, ती म्हणजे खुल्या प्रेक्षागृहाची!
साहित्य क्षेत्रातील दिग्गजांना ते अगदी उदयोन्मुख कलाकारांना आपली कला, येथील रसिकांसमोर सादर करण्यासाठी मिळालेलं हक्काचं व्यासपीठ!
इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सोयदेखील केलेली आहे.
निसर्ग आणि साहित्य यांचा सुंदर मिलाफ अनुभवायचा असेल तर नक्की भेट द्यावं असं एकमेव सुंदर गाव,भिलार!
एक विनम्र आवाहन-गावाचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न भिलारचे ग्रामस्थ करत आहेत. सोबतच त्यांनी स्वतःच्या घराचा/जमिनीचा काही भाग या प्रकल्पासाठी देऊ केलाय. या सर्वांबद्दल कृतज्ञता राखत आणि सामाजिक बांधिलकी जपत पर्यटकांनी प्रयत्नपूर्वक प्लास्टिकचा वापर टाळण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा.
Preet's Canvas links: [ Ссылка ] [ Ссылка ] [ Ссылка ] [ Ссылка ]
For more works of Rohini: [ Ссылка ] [ Ссылка ] [ Ссылка ]
For more information about the Bhilar: [ Ссылка ] [ Ссылка ]... [ Ссылка ] [ Ссылка ]... [ Ссылка ] [ Ссылка ]... [ Ссылка ]
Please leave your comments, and if you really liked it do like and share the content and Subscribe to be a part of this beautiful journey and many more.
![](https://i.ytimg.com/vi/xS8A9KRx9Tk/mqdefault.jpg)